रोटरी क्लब खोपोलीच्या इकोफ्रेंडली गणपती सजावट स्पर्धेत संतोष गायकर प्रथम

 

खोपोली / प्रतिनिधी :- रोटरी क्लब खोपोलीची दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी डिस्ट्रिक्ट व्हिजीट झाली. यावेळी  जिल्हा प्रांतपाल शीतल शाह व असिस्टंट गव्हर्नर नितीन कल्याण उपस्थित होते. रोटरी क्लब खोपोली तर्फे घेण्यात आलेल्या इकोफ्रेण्डली गणपती सजावट स्पर्धेत 15 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यामधून 7 स्पर्धकांची  निवड करण्यात आली. यामधून 5 स्पर्धक विजयी झाले. सर्व विजेत्यांना रोटरीचे प्रांतपाल शीतल शाह यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले. प्रथम क्रमांक संतोष गायकर, दुसरा क्रमांक सृष्टी सचिन गोटस्कर, तिसरा क्रमांक तुषार शंकर धुमाळ, चौथा क्रमांक अविनाश राऊत, साई नितीन पवार या सर्व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

क्लबचे सेक्रेटरी दिवाकरन पिल्ले यांनी दोन महिन्यात रोटरीने जे प्रोजेक्ट केले त्याचा अहवाल सादर केला. तसेच रोटरीचे अध्यक्ष मिलिंद बोधनकर यांनी या दोन महिन्यात ज्या रोटरी मेंबरांनी चांगले काम केले, त्यांचा प्रांतपाल शीतल शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डिजी (DG) नी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच नवीन रोटरी मेंबर महेश मंडलिक व सुनील नांदे यांचे सुध्दा स्वागत केले. 

या कार्यक्रमासाठी इनरव्हील अध्यक्षा जयश्री कलोशि, लायन्स क्लब अध्यक्ष भदोरीया, रोटरी क्लब पेणच्या अध्यक्षा संयोगीता टेमघरे, कर्जतचे दीपाचंद  जैन, लोनावळाचे अध्यक्ष नारायण शेरवळे तसेच खोपोली क्लबचे सर्व रोटरी मेंबर, इन्ट्रॅक्ट क्लब खोपोली मेम्बर, रोट्रॅक्ट क्लब खोपोलीचे पदाधिकारी व सर्व टीचर्स उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post