* वडवली येथील वसंत तलपे यांच्या घरातून 15 लाखांचा ऐवज लंपास
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडवली येथील वसंत मोतीराम तलपे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाडाचे लॉक तोडून त्यामधील गळ्यातील गंठन, हार, चैन, 2 अंगठ्या, 1कानातील जोड, 2 हातातील बांगड्या अशी अंदाजे 19 ते 20 तोळे सोन्याची चोरी केली आहे. या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
या वसंत मोतीराम तलपे म्हणाले की, घरात चोरी झाल्याचे आम्हाला सकाळी 9 वाजता समजले. नम्रता वसंत तलपे यांनी सकाळी नऊ वाजता कपाट खोलून पाहिले असता आतला लॉक तोडलेला दिसून आला. तेव्हा चोरी झाल्याचे समजले. लॉकर पाहिला तर तेव्हा समजले सोने पूर्ण नेले आहे. 16 तारखेला गळ्यातली गंठण वगैरे कपाटामध्ये ठेवली होती. आज सकाळी पाहिले तेव्हा लक्षात आले की, गळ्यातील गंठण, हार, चेन, 2 अंगठ्या, 1 कानातील जोड, 2 हातातील बांगड्या असा एकूण 15 लाख रूपयांचा ऐवज चोरी झाला आहे. चोराने कपाट उघडून आतील लॉकर तोडले व पुन्हा कपाट लावून चोर ऐवज घेऊन फरार झाला, असे वसंत तलपे म्हणाले. 8 दिवसामध्ये कधी चोरी झाली ते घरात माहिती नाही, आज सकाळी कपाट उघडून पाहिले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.