* खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांचे मुस्लिम समाजाच्या कामांवर दुर्लक्षपणा? मुस्लिम बांधवांचा आरोप!
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे आखिर संतापून मुस्लिम बांधवानी कब्रस्तानमध्ये रुजलेले भले मोठे गवत व जंगली झाडांची साफसफाई श्रमदानातून करण्यात आली. सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांची सर्वात मोठी मानल्या जाणारी ईद मिलादून्नबी म्हणजे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जन्मोत्सव संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात येणार आहे. या ईद मिलादून्नबीच्या दिवशी मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये आपल्या आईवडील तसेच कुटुंबातील मरण पावलेल्या कबरेची जियारत व फातिहाखानी, कुराणचे पठन, दुवा (प्रार्थना) करण्यासाठी या पवित्र दिवशी कब्रस्तानमध्ये आपल्या मुलाबाळांसोबत जातात. मात्र, खोपोली नगर परिषदेमध्ये असणारे हाळ बुद्रुक गावाच्या कब्रस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी येत नसल्याची तोंडी तक्रार मुख्याधिकारी पंकज पाटील व उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्याकडे अनेक दिवसांपासून करण्यात आली. मात्र हे जनतेचे लोकसेवक मुस्लिम समाजाच्या कामांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे.
उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांनी माहिती देतांना सांगतात की, नगर परिषदेकडे मनुष्यबळ (मैन पावर) नाही आहे, त्यामुळे साफसफाई करता येत नाही. कब्रस्तानमध्ये रुजलेला जंगली गवत कापण्यासाठी नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे का ? मुस्लिम समाज या देशातले रहिवाशी नाहीत का ? नगर परिषदेला मुस्लिम समाज कर भरत नाही का ? मुस्लिम समाजाचा कोणी वालीच नाही का ? या अधिकाऱ्यांकडून जातीय रंग का देण्यात येत आहे ? खोपोली नगर परिषद घनकचरा संकलन वाहतूक व प्रोसेसिंग शुभारंभ कार्यक्रमासाठी लाखों रुपये खर्च करण्यासाठी नगर परिषदेकडे मैन पावर आहे. पण मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये स्वच्छता करण्यासाठी मैन पावर नाही का? लोकप्रतिनिधींना ही मुस्लिम समाजाच्या वोटिंगची गरज लागणार नाही का ? अशा कामचुकार अधिकाऱ्याची त्वरित बदली करा, अन्यथा मुस्लिम समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम बांधवांनी दिला आहे.

