आजपासून माझं खोपोली शहर 'स्वच्छ शहर' म्हणून ओळखले जाईल - आ. महेंद्र थोरवे

 

* खोपोली नगर परिषद हद्दीतील घनकचरा संकलन वाहतूक व प्रोसेसिंग करणे या कामाचा शुभारंभ 

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहर स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा संकल्प आ. महेंद्र थोरवे यांनी शहरातील घनकचरा वाहतूक व प्रक्रियेच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला. यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून आणला असे स्पष्ट करुन भविष्यकाळात या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट आ. थोरवे यांनी याप्रसंगी जाहीर केले. खोपोली शहरच नव्हे तर कर्जत मतदार संघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. प्रशासक तथा  मुख्याधिकारी पंकज पाटील व ठेकेदार व्हीडीके सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असा आदेशही त्यांनी दिला. शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून खोपोली शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही राजकारण न आणता शहरातील विविध प्रश्नांबाबत उपाय योजना करीत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमास मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज पाटील, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल, राजू गायकवाड, शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील, शिव उद्योग व सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश काळे, माजी नगरसेवक संतोष मालकर, भाजपचे हेमंत नांदे, रॉबीन सॅम्युअल, अनिल मिंडे, तात्या रिठे, सोनू शेलार, जिनी सॅम्युअल्स, शेखर जांभळे, प्रिया जाधव, नितीन पवार, मोहसिन शेख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी भविष्यात कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पालिका आरोग्य विभाग कर्मचारी व्हीडीके फॅसिलिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत असून घनकचरा संकलन वाहतूक प्रोसेसिंग करण्यासाठी 16 वाहनांचा ताफा काम करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना उद्घाटक आमदार महेंद्र थोरवे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हातून हिरवा झेंडा दाखवत करण्यात आला.

व्यवस्थापक दिपक घनवट यांना 904963500 या क्रमाकांवर नागरिकांनी काही सूचना, माहिती मदत व तक्रारींसाठी कार्यालयास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post