* आ. सचिन अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती
खोपोली / प्रतिनिधी :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी आमदार नितीन सावंत यांच्या कर्जत-खालापूर खोपोली मध्यवर्ती कार्यालय 'शिवालय'चे बुधवार, दि. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आ. सचिन अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भावी आमदार नितीन सावंत यांच्या माध्यमातून खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांच्या संपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, तरी उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रेमी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.