* युवा नेतृत्वाने मिळतोय महिलांना आधार
* खोपोलीकरांच्या मनातील भावी नगरसेविका
खोपोली / प्रतिनिधी :- आज महाराष्ट्रासह खोपोली, खालापुरातील महिलांना एका खंबीर नेतृत्वाची उणीव भासत आहे. महिला व तरुणींच्या समस्या समजून घेवून 'त्या' शासन व प्रशासनाकडे मांडणाऱ्या नेतृत्वाची उणीव खोपोलीतील युवा नेत्या मुस्कान सैय्यद यांनी भरून काढली आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे असो की, उरण व बदलापूर घटनेविषयी आवाज उठविणे मुस्कान सैय्यद सर्वात आघाडीवर दिसून आल्या.
मुस्लिम महिलांसह खोपोली व खालापूर तालुक्यातील महिला, तरुणी व विद्यार्थींनींना आपल्या समस्या जाणून घेणारी....समस्या सोडविणारी...आपल्यासाठी लढा उभारणारी...आपली भुमिका मांडणारी मुस्कान सैय्यद आज आपलीशी वाटू लागली असून त्यांनी नगरसेविका व्हावे, अशी मनोकामना सर्वसामान्यांतून केली जात आहे. युवा समाजसेविका म्हणून मुस्कान सैय्यद यांनी अनेकांना मदत केली आहे. अनेक आंदोलन...उपक्रम व अभियानात मुस्कान सैय्यद यांचा पुढाकार असतो.
अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे यांना न्याय मिळावा यासाठी मुस्कान सैय्यद यांनी आंदोलन उभारले होते. तसेच कुटुंबियांची भेट देवून त्यांचे सांत्वन देखील त्यांनी केले होते. महिलांवर अन्याय झाल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढा उभारू असा इशारा मुस्कान सैय्यद यांनी दिला आहे. खोपोली व खालापूर तालुक्यातील अनेक गरजूंना मदत करण्यात तसेच रंजल्या गांजलेल्यांसाठी सर्वतोपरी न्यायाची भुमिका मुस्कान सैय्यद मांडत असतात.