खोपोली / मानसी कांबळे :- दैनिक कोकण प्रजा...दैनिक कोकण प्रदेश न्यूज...कोकण प्रवाह, इंटरपोल, केपी न्यूज चैनलचे मुख्य संपादक तथा स्वदेश न्यूज या हिंदी सैटेलाईट न्यूज चैनलचे महाराष्ट्र सिनिअर रिपोर्टर...युनायटेड जर्नालिस्ट फोरमचे राष्ट्रीय संयोजक फिरोज पिंजारी यांचा आज खोपोली नगर परिषदेकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सन्मान करण्यात आला.
निर्भिड, निष्पक्ष पत्रकारीतेसाठी फिरोज पिंजारी खोपोली, खालापूर रायगड व महाराष्ट्रभरात ओळखले जातात. मागील 15 वर्षापासून फिरोज पिंजारी पत्रकारिता करीत असून त्यांच्या लेखणीने आजवर शेकडो लोकांना न्याय मिळवून दिला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते 'चौथास्तंभ' पुरस्कारासह शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील, माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, माजी नगरसेवक किशोर पानसरे, उपमुख्याधिकारी गौतम भगळे आदी उपस्थित होते.