खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली महात्मा फुले भाजी मार्केटचे व्यापारी कै. ह. भ. प. बाळासाहेब तुकाराम धामणकर यांचे चिरंजीव आतिश बाळासाहेब धामणकर यांच्या सनातन पूजा भंडार दुकानाचे नुकतेच कर्जत - खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आले.
कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे युवा पिढीला व्यवसायासाठी प्रोत्साहन देतात आणि खोपोली भाजी मार्केट येथील व्यापाऱ्याच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून निवारण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. खोपोली भाजी मार्केटचे व्यापारी कै. ह. भ. प. बाळासाहेब तुकाराम धामणकर यांचे चिरंजीव आतिश बाळासाहेब धामणकर यांच्या सनातन पूजा भंडार या दुकानाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हातून झाल्याने खोपोली भाजी मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
या उद्घाटनप्रसंगी शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, दिनेश थोरवे, देहू म्हामुणकर, गणेश खानविलकर, पंकज पाटील, अविनाश किर्वे, निखिल पोळ, इस्माईल कर्जिकर, सचिन किर्वे आणि भाजी मार्केटचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.