'आम आदमी'चा आवाज शिवसेनेच्या वाटेवर?

* आ. महेंद्र थोरवे यांची खोपोलीत ताकद वाढणार!

खोपोली / फिरोज पिंजारी :- एका मोठ्या राजकीय पक्षाला खोपोली-खालापूर सह रायगड जिल्ह्यात मोठी ताकद देत विरोधकांपुढे सक्षम पर्याय उभा करणारा खोपोली शहरातील 'आम आदमी'चा आवाज लवकरच दिल्लीश्वरांना 'राम राम' करण्याच्या बेतात असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वच पक्ष व्युहरचना आखत आहेत. दररोज विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, वाड्यावस्त्या यांचा प्रवेश सोहळा विविध पक्षांच्या कार्यालयात रंगत आहे. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून खोपोली शहरातील 'आम आदमी'चा आवाज...सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात गरूडक्षेप घेणारे नेतृत्व आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवकरच शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामिल होणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांना कोहिनूर हिरा गवसणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात संबंधित नेत्याची मोठी ताकद असल्याने त्याच्या पक्ष प्रवेशाने खोपोलीसह खालापूर तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेची मोठी ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, पक्षातील अंतर्गत बंडाळीला कंटाळून संबंधित नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने खोपोली-खालापुरातील 'आम आदमी'चा आवाज घटणार असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post