मोफत थर्मल मॉमोग्राफी शिबिर

 

* रायगड मेडिकल असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

खोपोली / दिनकर भुजबळ :- स्तनाचा कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, ज्याचे लवकर निदान झाल्यास प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. रायगड मेडिकल असोसिएशन आणि खोपोली डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत २० जुलै २०२४ रोजी खोपोली येथील अनुजा नर्सिंग होम येथे मोफत थर्मल मॉमोग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉं. निशिकांत आठवले यांच्या संकल्पनेतून आयोजित शिबिरात इंडियन कॅन्सर ट्रिटमेंट सेंटर, नवी मुंबई मार्फत एकूण ७० महिलांची मोफत तपासणी करण्यात आली.

डॉं. बुर्शा फाहिम व सिस्टर ज्योती डोळस यांनी महिलांची तपासणी व थर्मल मॉमोग्राफी केली. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉं. प्रदीप पाटील, डॉं. हेमंत पाटील, डॉं. राहुल वीर, डॉं. सरोजिनी कटकदौंड, डॉं. सुषमा देवडीकर, डॉं. सई खर्डेकर, डॉं. दर्शन आवस्कर व इंडियन कॅन्सर ट्रिटमेंट सेंटरचे फिरोज पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी डॉं. सुभाष कटकदौंड यांनी रायगड मेडिकल असोसिएशनच्या वतीने इंडियन कॅन्सर ट्रिटमेंट सेंटरच्या डॉं. सलिल पाटकर व मार्केटिंग टीमचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post