नाशिक / प्रतिनिधी :- इस्टोनिया (उत्तर युरोप) येथील युरो एशियन विद्यापीठाकडून क्रीडा क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत डॉं. निलेश राणे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पीएचडी (मानद) पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. 20 जुलै रोजी युरो एशियन विद्यापीठामार्फत मुंबई येथे आयोजित पदवी प्रदान समारंभात डॉं. राणे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. याच सोहळ्यात डॉं. राणे यांना भारत नागरी गौरव सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आले. नाशिकच्या तरुणाची सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील ही कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून डॉं. निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.
युरो एशियन विद्यापीठाकडून डॉं. राणे यांना पीएचडी (मानद) पदवी जाहीर झाल्यानंतर माजी कृषी व महसूलमंत्री तथा विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे त्यांचा सत्कार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी देखील डॉं. निलेश राणे यांची भेट घेत त्यांना पदवी जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर हा प्रत्यक्ष पदवी प्रदान समारंभ तुंगा हॉटेल, मुंबई येथे संपन्न झाला.