अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाउंडेशन अकोला दर शनिवारी स्त्री रुग्णालय येथे अन्नदान 2018 पासून सतत चालू आहे. हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जे बेवारस लोक आहेत जे थंडीने कुडकुडत आहेत अशा लोकांना मानव सेवा फाउंडेशन तर्फे ब्लॅंकेट व उलन टोपी वाटपाचा कार्यक्रम मानव सेवा फाउंडेशन करते तसेच वर्षभर विविध कार्यक्रम ज्यात पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण व संगोपन असे विविध कार्यक्रम मानव सेवा फाउंडेशन व पायी जाणाऱ्या वारकरींना मानव सेवा फाउंडेशन काही सेवा देतात.
दि. 20 जुलै 2024 शनिवारी सकाळी 9 वाजता लेडी हार्डिंग स्त्री रुग्णालय येथे अन्नदान करण्यात आले. प्रमुख उपस्थिती विवेक सर पारस्कर यांच्या शुभहस्ते अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी विवेक पारस्कर, राजेश धनगावकर, कैलास खरात, सिद्धोधन इंगळे, राहुल विजय खंडाळकर हे उपस्थित होते. ज्या कोणांना अन्नदान करायचे असल्यास मानव सेवा फाऊंडेशन तर्फे त्यांनी राहुल विजय खंडाळकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.