* युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांचा संयुक्त उपक्रम
पेण / प्रतिनिधी :- येथील युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते. या कार्यक्रमास शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, रायगड जिल्हा डी. वाय. फाउंडेशनचे अध्यक्ष यश घरत, अलिबाग तालुका प्रमुख धीरज मालवी तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सदस्य रवींद्र चव्हाण होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे सदस्य श्रीकांत जाधव, आशिष कोचरगावकर, सुचित्रा समेळ, चंद्रकांत अंबाजी घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड, कविता गावंड, महिला अध्यक्षा मयुरी कैलास घरत, कीर्ती देसले, ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा विद्यमान सदस्या अनिता संतोष वाघे, संगीता वाघे, विजय गोपीनाथ ठाकूर, रमाकांत देसले, बळीराम घरत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक कैलासराजे घरत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी मंगेश कांबळे सर यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा या शाळेतील इयत्ता पाचवी मधील पेण तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आलेल्या प्रियांश चंद्रकांत घरत याचा चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला.
एम. एस.टी स्कूल कासारभटमध्ये 91% गुण मिळवित द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पायल रमाकांत देसले हिचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत, ट्रस्टचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. भानूबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यामंदिर तारामध्ये 82.60% गुण मिळवित द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जिज्ञासा नरेश पाटील हिचा शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. माध्यमिक विद्यामंदिर खारपाडामध्ये 79.60 % गुण मिळवित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इशिका विजय पाटील हिचा युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण कैलासराजे घरत यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, नरेश शंकर पाटील, यश दिनेश पाटील, अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले