* स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) चा उपक्रम
खोपोली / खलील सुर्वे :- पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बन डायऑक्साइडसारख्या वायूंमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे अनेक भागात उष्णतेत वाढ होत असून यापासून बचावाकरीता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी खोपोलीत वृक्षारोपण केले.
3 जुलै रोजी शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्था दादर यांची पावसाळी सहल खोपोली येथे आयोजित करण्यात आली होती. या सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने यावेळी खोपोली शिळफाटा येथील शासकीय दुग्धालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता संस्थेच्यावतीने यंदा अशोक, पिंपळ, चिंच अशा विविध 200 वृक्षांची रोपे ठिकठिकाणी लावण्याचा सामजिक कार्यक्रम पार पडला.
यावेळी मार्कटचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार, फुलमार्केटचे सचिव व संस्थेचे सल्लागर अजय कौसाले, सचिव योगेश बागल, खजिनदार बापूसो लोळे, संचालक तुषार भोसले, जगन्नाथ टेकवडे, हरिदास मांजर्डेकर, अमोल भाई, विरेंद्र जाचक, समाधान जगदाळे, स्वप्निल खांडगे, राजेंद्र पवार, शंकर लोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते व त्याचबरोबर खोपोलीमधील शासनाचे दुग्धविकास सरिता डेअरीचे व्यवस्थापक अधिकारी राजेश म्हात्रे, आशिष घोसाळकर आदी उपस्थित होते.
जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होत असून यापासून बाचावाकरीता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार यांनी सांगितले.
