उद्योजक मनोज पवार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान



कन्नड / साईबाज शेख :- कन्नड शहरातील केशव पुष्प उद्योग समुह तसेच उद्योजक मनोज पवार, समाजसेविका उर्मिलाताई पवार यांच्या वतीने तालुक्यातील दहावी-बारावीच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी डॉं. टी. पी. पाटील, प्रा. डॉं. संजय गायकवाड, प्रा. रंगनाथ लहाने, वित्त व लेखापरीक्षण अधिकारी शरद भिंगारे, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पवार, साने गुरुजी संस्थेचे अध्यक्ष डॉं. मिलिंद पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी. एस. कदम, उत्तमराव राठोड, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, अहमद अली, प्रा. संतोष मतसागर, काकासाहेब कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शहरातील राजुरेश्वरी मंगल कार्यालयात पार पडला.

यावेळी बोलतांना सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी पाटील म्हणाले की, शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. शिक्षणाच्या बळावर डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. सदाचार व उच्च दर्जाच्या चारित्र्याने शिक्षणाला सुवर्ण कोंदण लाभतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सुसंस्कृतपणाही जोपासावा ज्या विद्यार्थ्यांवर दहावीनंतर चांगले संस्कार होतात तीच मुले पुढे यशस्वी होतात स्पर्धेत टिकतात, असा विश्वास सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी डॉं. टी. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post