बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे यांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित

 


वसमत / प्रतिनिधी :- डॉं. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीमध्ये काम करणारे समतादूत मिलिंद आळणे हे आहेत. समाजात असलेली असमानतेची दरी कमी करून समता प्रस्थापित करण्याचे तसेच सामाजिक न्याय विभागातर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समाजातील दुर्बल घटकांना देणे डॉं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांचे विचार व साहित्य समाजात प्रस्थापित करणे, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाची माहिती व अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे मागील अनेक वर्षापासून तन्मयतेने करीत आहेत.

त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय प्रतिभा गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित केले आहे. आयुष्यमान मिलिंद आळणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे राष्ट्रीय प्रतिभा गौरव हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉं. चंद्रभान इंगोले, डॉं. निलेश आळणे, डॉं. रमेश मेढे, रणवीर सर मुख्याध्यापक डॉं. नरवाडे, डॉं. प्रशांत आळणे, केशव गायकवाड बिल्डर, सिध्दार्थ आळणे ग्रामविकास अधिकारी, जयशिल मेढे आयआयटी इंजिनीअर डॉं. निशांत थोरात, सिध्दार्थ गोवंदे प्रकल्प अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post