खालापूर / प्रतिनिधी :- रविवार, दि. 21 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्रशेठ घरत यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष किरीट भाई पाटील यांच्या हस्ते सागर भगवान जाधव (सरचिटणीस खोपोली शहर काँग्रेस कमिटी) यांची खालापूर तालुका इंटक (भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस) तालुका अध्यक्ष पदावर नेमणुक करण्यात आली.
यावेळी गुरूपौर्णिमेचे औचित साधून यमुना सामाजिक शिक्षण संस्थेमार्फत १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिद्धी विनायक बॅक्वेट हॉल शेलघर (उरण) येथे विद्यार्थ्यांचा सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रिचर्ड जॉन (अध्यक्ष खोपोली शहर काँग्रेस), नंदराज मुंगाजी, विनोद ठाकूर, जे. डी. जोशी, मार्तंड नखवा, नाना म्हात्रे, अखलाक शिलोत्रि, कृष्णा पारंगे, महादेव केटकर, निखिल डवळे, वैभव पाटील, विवेक म्हात्रे, मुक्तार शेख आणि रायगड जिल्हा काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.