* दिवसभरात भजन स्पर्धेसाठी वारकऱ्यांसह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे मोठे बंधू शिवसेनेचे नेते तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून स्व. भजनभूषण गजाननबुवा पाटील संगीत भजन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कर्जत विधानसभेतील अनेक भजनी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. कर्जत पोसरी येथील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या भव्य सभागृहात सकाळी या संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाल्यानंतर दिवसभरात असंख्य वारकऱ्यांसह विविध क्षेत्रातील भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून संगीत भजनातील गायनाचा आनंद अनुभवला.
कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, ह.भ.प. सदाशिव महाराज थोरवे, ह.भ.प. रंभाजी महाराज थोरवे, संभाजी थोरवे सुंदरबाई थोरवे, उपसभापती मनोहर थोरवे, मनीषा मनोहर थोरवे, मीना महेंद्र थोरवे, विश्वनाथ थोरवे, मनीषा भासे, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे, युवासेनेचे विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, स्व. भजनभूषण गजानन पाटील यांचे पुत्र प्रसादबुवा पाटील, कन्या सुचित्रा वांजले, गजाननबुवा पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक करोडे यांसह कर्जत व खालापूर तालुक्यातील भजन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजित भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक श्रीधर भोसले, ज्येष्ठ पखवाद वादक मधुकर घोंगडे आणि तबला वादक विवेक भागवत यांनी स्पर्धेतील सहभागी भजनी मंडळ यांना स्पर्धेतील नियमांबाबत सूचना देत स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक भजन मंडळांनी आपले गायनातील कौशल्य सादर केले. स्व. गजाननबुवा पाटील संगीत भजन स्पर्धेत उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट गायक, उत्तेजनार्थ बक्षीस यांसह तीन भजन मंडळ व तीन महिला भजन मंडळांना आमदार महेंद्र थोरवे व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पोसरी या ठिकाणी आयोजित भजन स्पर्धेत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेवाली, स्वरांजली भजन मंडळ इंजिवली, श्रीराम भजन मंडल निंबोडे, विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ साळपे, एकविरा प्रासादिक भजन मंडळ अरवंद, नादब्रह्म भजन मंडळ तिघर, विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बिरदोळे, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ तुंगी, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ अंत्रट नीड, स्वर निषाद भजन मंडळ शेलू, ओमकार प्रासादिक भजन मंडळ आसरोटी, शिरसाई प्रासादिक भजन मंडळ शिरसे, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कशेळे, ओम साई भजन मंडल कोळिवली, माऊली प्रासादिक भजन मंडळ धोत्रे, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ उमरोळी, छत्रपती प्रासादिक भजन मंडळ सावरगाव, मुक्ताई प्रासादिक भजन मंडळ कशेळे, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ तिघर, श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ चिंचवली शेकीन अशा अनेक भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामुळे या संगीत भजन स्पर्धेतील भजनाचा आनंद घेण्यासाठी आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आनंद घेतला.
माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी आपल्या वाढदिवशी कर्जत व खालापूर तालुक्यातील अनेक भजन मंडळांना आमंत्रित करून संगीत भजन स्पर्धेचे देखणे व दिमाखदार असे यशस्वी आयोजन करुन या क्षेत्रातील अनेक तरुण भजनी कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण जे कार्य केले आहे ते निश्चितच भूषणावह व कौतुकास्पद आहे.
- प्रसादबुवा पाटील (संस्थापक - स्व. गजाननबुवा पाटील स्मारक समिती)