* प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत येथे क्षेत्रभेट
कर्जत / नरेश जाधव :- स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनमध्ये रौप्य महोत्सव वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे क्षेत्र भेट दि. १६ जुलै २०२४ रोजी शाळेच्या इयत्ता ७ वी, ८ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत येथे भेट दिली.
प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत येथील अधिकारी महेश घारपुरे सर व सहाय्यक सागवेकर यांनी विद्यार्थ्यांना भात शेतीची माहिती दिली. भाताच्या विविध जातींची लागवड पद्धती, खतांचे नियोजन, नवीन भात जात संशोधन पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेतीचे महत्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांना भात शेतीची लागवड पद्धती समजण्यासाठी प्रत्यक्ष भात लावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणी केली. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मुकुंद मेढी, शालेय समिती अध्यक्ष माधव भडसावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा कडू, माया म्हसे, शिक्षक राजू शिंदे, किरण पालवे, किशोर दिघे, विनायक अहिरे, शिल्पा जाधव, जागृती दाभाडे आदी शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
