चंद्रमा फाउंडेशन आणि कलाकार स्टुडिओ अभिनय अकॅडमी तर्फे वृक्षारोपण

 


मुंबई / प्रतिनिधी :- चंद्रमा फाउंडेशन आणि कलाकार स्टुडिओ अभिनय अकॅडमी चेंबूर मुंबई आणि मुक्ताई नृत्यविष्कार डान्स अकॅडमी चुनाभट्टी यांच्या सहकार्याने रविवार, दि. 7 जुलै 2024 रोजी मुंबई महानगरपालिका मासाहेब मीनाताई ठाकरे बॉटॅनिकल उद्यान प्रियदर्शनी येथे झाडे लावा झाडे जगवा व झाडे वाढवा हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या या उपक्रमात बालकलाकारांनी आणि रंगमंचावर तसेच टेलिव्हिजनवर प्रसिद्ध कलाकारांनी सहभाग घेतला व विविध रोपांची लागवड केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता निकेतन धुमाळ (M.A. D.ED. B.ED) प्राध्यापिका, नृत्य दिग्दर्शक, उपाध्यक्ष अ. भा. म. साहित्य परिषद, कलाकार स्टुडिओ अभिनय अकॅडमी चेंबूर संस्थेचे संस्थापक विजय खुरपे तसेच प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक चंद्रमा फाउंडेशन नितिन मच्छिंद्र घोडेस्वार अभिनेता, नृत्यदिग्दर्शक विनोद मोहिते आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला स्वामी कन्नन, कन्नन पेरीस्वामी, मुथु पुजारी, अर्चना मुरगन आणि दिव्या इलायाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे वृक्षारोपण झाल्यावर झाडांची काळजी घेण्याचे आश्वासन गार्डनच्या कर्मचाऱ्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post