चोपडा / महेश शिरसाठ :- चोपडा ग्रामिण पोलिस स्टेशनच्या धडाकेबाज व कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांनी गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत आज तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिरास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी तिर्थक्षेत्रावर आंबा, चिकू, निम व वड अशा प्रजातींच्या झाडांची लागवड केली. तसेच गुरू पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यालाही उपस्थिती देवून महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मंदिर परीसरात काही लोक अंधश्रद्धेतून काही गैरप्रकार करून पावित्र्य नष्ट करत होते, त्यांना मँडमांनी असे प्रकार या तिर्थक्षेत्रावर परत होता कामा नये अशी ताकीद वजा समज दिली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे कर्मचारी, चौगावचे पोलिस पाटिल गोरख हरचंद पाटिल, मेजर वसंत कोळी, कृषी विस्तार अधिकारी सतिष कोळी, वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, शांताराम पाटिल (फौजी) सदस्य महेंद्र राजपूत, समाधान कोळी, भरत धनगर, रितेश धनगर, गणेश पाटिल, गोकूळ कोळी, किशोर बाविस्कर, अनिल राजपूत, सुनिल कोळी, वनमजूर रावसाहेब कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.