कर्जत-खोपोली महामार्गांवर दुचाकीची कारला जोरदार धडक


* अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी तर दुचाकीचा चक्काचूर 

खोपोली / खलील सुर्वे :- कर्जत-खोपोली महामार्गांवर शनिवार, दि. २० जुलै रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास कोकण मॅरेज हॉल समोर अंजरूण गावाच्या हद्दीत एका दुचाकीने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले असून दुचाकी चक्काचूर झाली आहे.

कर्जतहुन खोपोलीकडे जाणारी दुचाकी (क्र. MH 46 TC040) कोकण मॅरेज हॉल येथे आली असता कर्जतच्या दिशेने उभी कार (क्र. MH01 BB0356) ला दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून उजव्या बाजूला जोरदार धडक मारल्याने अपघात झाला. या अपघात दुचाकीवरील कमळ सोळंकी (वय 17, रा. कर्जत आमराई), वेदांत बोराडे (वय 17, रा. वडवली) हे जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दुचाकी व कारचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळतात अपघातग्रस्त टीमचे सदस्य व ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत घटनास्थळी हजर  झाले व मदतकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post