खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाला 'दे धक्का'

  

* खरसुंडी ग्रामस्थांचा आ. महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश 

कर्जत / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभेचा अत्यंत कमी कालावधीत सर्वांगीण विकास साधणारे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव ठाकरे गटातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश पुढील काळात शिवसेनेसाठी वरदान तर विरोधकांची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे. 

शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी कर्जत येथील बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील, चंदू फावडे,युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे, राजू शहासने, दिगंबर सालेकर, पितांबर लबडे, ॲंड. कृष्णा पवार, प्रमोद साळुंखे, अमित देवघरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

याप्रसंगी खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्या सुगंधा कृष्णा पवार, सागर बारस्कर, माजी उपसरपंच विशाल बारस्कर, रूपचंद पोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ धाद्रूत, संजय बारस्कर, हरेश धाद्रूत, करण जाधव, परेश सावंत, अभिषेक मालुसरे, महेंद्र बारस्कर, कैलास जगताप, नरेंद्र पारठे, ऋषिकेश बारस्कर, समीर बारस्कर, सुशांत कदम, राकेश भऊड, सतीश धाद्रूत, रुपेश तांबे, कैलास जगताप, प्रितम जगताप, सागर बारस्कर, अक्षता बारस्कर, पंकज सावंत, स्मिता सावंत,किरण बारस्कर, नम्रता बारस्कर, विश्वजित सालेकर, गुरुनाथ कदम, ज्योत्स्ना कदम, नविन बारस्कर, नंदिनी बारस्कर, संजय बारस्कर, सुशांत कदम, हरेश धांद्रुत, ऋषिकेश बारस्कर, कैलास धांद्रुत, करण जाधव, समीर बारस्कर, सिद्धेश बारस्कर, ऋतिक धांद्रुत,अभिजीत मालुसरे, अस्मिता मालुसरे, परेश सावंत, कृष्णा बारस्कर, प्रदीप साळेकर, महेंद्र बारस्कर, राहुल बारस्कर, राकेश भाऊड, धनाजी कदम, संतोष पारठे, मंदार बारस्कर, ऋषिकेश कदम, नरेंद्र डफाळ, योगेंद्र पारठे, नम्रता पारठे, सतीश धांद्रूत, वैशाली धांद्रूत, वैभव मोरे, साईनाथ शिंदे, ईश्वर धांद्रूत, रुपेश बारस्कर, प्रणय कळमकर, रुपेश चौधरी, राजेश भऊड, वैभव बारस्कर, रोहिदास साळेकर, संतोष बारस्कर व सचिन सालेकर आदींचा समावेश आहे. 

कर्जत विधानसभा क्षेत्रातील कर्जत व खालापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिवासी वाड्या, वस्त्या व दुर्गम भागातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची घौडदौड ज्या पद्धतीने सातत्याने सुरु ठेवली आहे, त्याच विषयावर प्रेरीत होवून आज सर्वसामान्य नागरीकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत.  

- विजय पाटील

संपर्क प्रमुख शिवसेना रायगड जिल्हा.

Post a Comment

Previous Post Next Post