आ. महेंद्र थोरवे व डॉं. सुनील पाटील यांच्यात कडवी टक्कर ?

  


* कर्जत विधानसभा : व्होट पोलमध्ये दोघांना पसंती 

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली. आजी-माजी लोकप्रतिनिधी व भावी आमदारांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये देखील बहुरंगी लढत रंगण्याची शक्यता असली तरी दोन उमेदवार मतदारांमध्ये फेव्हरेट (पसंद) असल्याचे दिसून येत आहे. 


Strapoll (स्ट्रा पोल) च्या माध्यमातून कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये एक पोल घेण्यात येत आहे. या पोलमध्ये आतापर्यंत 1643 लोकांनी सहभाग घेतला. त्यामधून 1581 जणांनी आपले मत नोंदविले. या 1581 पैकी आमदार महेंद्र थोरवे यांना 415 तर डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना 510 मते मिळाली आहेत. खरी लढत या दोन उमेदवारांमध्ये दिसून येत असून यानंतर सूधाकर घारे यांना 345, नितीन सावंत यांना 203 व किरण ठाकरे यांना 171 व्होट पोलमध्ये मिळाले आहेत. मतांची टक्केवारी पाहिली असता डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना 31.02 टक्के, आमदार महेंद्र थोरवे यांना 25.24 टक्के, सुधाकर घारे यांना 20.99 नितीन सावंत यांना 12.35 टक्के, किरण ठाकरे यांना 10.40 टक्के मते मिळाली. 


आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील 5 वर्षात केलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर जनतेने दुसऱ्यांदा त्यांना संधी द्यावी, अशी नागरिकांची मानसिकता दिसून येत आहे. तर दुसरीकडे खोपोली-खालापूर तालुक्याला पहिल्यांदाच आमदारकीची संधी दिसत असल्याने तसेच डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी नगराध्यक्ष पदी असतांना केलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर खोपोलीसह खालापूर तालुक्यातून त्यांना चांगला रिस्पॉन्स दिसत असल्याचे दिसून येत आहे. या पोलमध्ये आमदार महेंद्र थोरवे व डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यात कडवी झुंज दिसत असली तरी मतदानानंतर कौन जिंकणार? आमदार कौन होणार? हे मतदार ठरवतील. 

Post a Comment

Previous Post Next Post