* कर्जत शिवसेनेत जोरदार इनकमिंग तर राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात आऊटगोइंग सुरू
कर्जत / विलास श्रीखंडे :- रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभेचे तरुण, तडफदार आणि कर्तृत्ववान आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टीतून संपूर्ण कर्जत विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताना आपल्या पहिल्या फेरीतच विकासकामांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत विधानसभेचे नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर सुवर्णक्षरात कोरले आहे. तर, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खंदा समर्थक अर्थात सहकारी म्हणून आमदार थोरवे यांची विशेष ओळख सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण विधानसभा क्षेत्रात तयार झाला असून या सर्व बाबींचा विचार करता कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली व आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
रविवार, दि. २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांतून कर्जत मुख्य शहरातील बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश पार पडला. त्याप्रसंगी वाकस ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच संजय तांबोळी, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयवंत शिणारे, उपसरपंच अशोक पेमारे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे, कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख अमोल देशमुख, धोत्रे येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक रसाळ, भरत कांबरी आदींसह सुमारे दोनशेहून अधिकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्याप्रसंगी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, तालुका समन्वयक रमेश मते, सल्लागार संतोष भोईर, संतोष कोळंबे, रामचंद्र मिणमिणे, मनोहर थोरवे, रामचंद्र बदे पंढरीनाथ पिंपरकर, भरत डोंगरे, मिलिंद विरले, प्रशांत झांजे, भरत हाबळे, सुनील ठाकूर, अनिल शेमटे, संदीप रसाळ, संदेश सावंत, प्रसाद थोरवे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिवसेना पक्ष संघटनात्मक दृष्टीने एक अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात आउटगोइंग सुरू झालेली पाहायला मिळत असल्याने आमदार थोरवे यांजकडून विरोधकांसाठी हि मोठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याप्रसंगी कर्जतमधील वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय तांबोळी, जयवंत नारायण शिनारे, पंढरीनाथ तांबोळी, मारुती शिनारे, विठ्ठल कोळंबे, सुदाम डांगरे, बबन तांबोळी, दत्ता डांगरे, दिनकर मिसाल, स्वामीनाथ डांगरे, वसंत तांबोळी, शिवाजी मार्के शांताराम काळे, शांताराम तांबोळी, रमाकांत तांबोळी, आत्माराम डांगरे, मंगल मुने, दत्ता मिसाळ, हसू तांबोळी, विजय तांबोळी, राजेश तांबोळी, अर्जुन तांबोळी, गणेश तांबोळी, दत्ता जोगळे, सागर तांबोळी, तानाजी मिसाळ, हरिश्चंद्र यांनी तांबोळी, राजेश तांबोळी, अविनाश डांगरे, जगदीश डांगरे, जयवंत तांबोळी, प्रदीप डांगरे हरिचंद्र तांबोळी, रुपेश डांगरे, विलास तांबोळी, विशाल तांबोळी, महेश तांबोळी, विकास कांबळे, प्रदीप तांबोळी, रोशन शिणारे, परेश शिनारे, दिनेश तांबोळी, रवी मिसाळ, वाळकु तांबोळी, विलास कांबळे, निलेश मिसाळ, हितेश कांबळी, धीरज तांबोळी, सुशांत तांबोळी, मच्छिंद्र मसने, काशिनाथ जोगळे, नरेश तांबोळी, सतीश तांबोळी यांनी प्रवेश केला. तर नेवाली येथील अशोक पेमारे, कैलास शीनारे, तानाजी शिनारे, रमेश ताम्हाणे, रघुनाथ ताम्हाणे, उमेश ठोंबरे, विकी शिनारे, पुंडलिक भागित, प्रदीप शिनारे, भरत बोराडे, शिवाजी दुर्गे, किरण दुर्गे ,संतोष दुर्गे, ऋषिकेश शिनारे, अशोक भगित, राजेश शिनारे, सुनील ठोंबरे, योगेश दुर्गे, मंगेश शिनारे, गोविंद पेमारे, मनोहर दुर्गे, ललित शिनारे, समाधान शिनारे, भरत शिनारे, रोहन शिनारे, हितेश शिनारे, रोहिदास शिनारे, गणेश भागित, निलेश शिनारे, केतन शिनारे, संभाजी दुर्गे, योगेश दुर्गे यांसह बोरगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती विभाग प्रमुख अमोल देशमुख, उल्हास देशमुख, राजेंद्र देशमुख, वसंत पाटील, रामा चौरे, अरविंद पाटील, सचिन पाटील, नितीन पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, जनार्दन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तानाजी पाटील, सचिन शंकर पाटील, निलेश देशमुख, आकाश देशमुख, शिवाजी देशमुख, सुरज देशमुख, मनोहर पाटील, समीर देशमुख, अनिल देशमुख, ओंकार देशमुख, खुशाल देशमुख, भास्कर भरत पाटील, दीपक देशमुख, रवींद्र माळी, मयूर खेडेकर व महेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच धोत्रे गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भागाजी रसाळ यांच्या नेतृत्वाखाली विलास रसाळ, जनार्दन गोमारे, गणेश रसाळ, अनिल रसाळ, अमर रसाळ, मिलिंद रसाळ, अभिजीत रसाळ, निवृत्ती रसाळ, दशरथ रसाळ, अनुव वारे, कांतीलाल रसाळ यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तसेच बोंदेशेत, पेंढरी आणि तेलंगवाडी येथील यशवंत जाणू थोरात, हरिचंद्र तुळशीराम धनकर, भरत होळे, भाऊ कांबडी, धीरज थोराड, भरत पारधी, वसंत बुरुड, रवींद्र होळे, किरण थोरात, रमेश होळे, प्रभू होळे अनंत थोरात, धनाजी थोरात, हरिचंद्र थोराड, महादू आवटे, अनंता थोरात, सोमा गिरा, गणेश खंडवी, पिंट्या गिरा, जनार्दन होले तर, बार्डी येथील नामदेव कांबरी, रमेश कांबरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भरत कादंबरी, नरेश कांबरी, वसंत कांबरी, विजय कांबरी, पांडुरंग कांबरी, चिचवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच दिपाली कांबरी, सविता कांबरी, रेशमा कांबरी आणि चेतना कांबरी आदींनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे विशेष औचित्य साधत शिवसेनेतील माझे सर्व सहकारी अर्थात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आजच्या या विशेष दिवशी शिवसेना पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा जो पक्षप्रवेश करुन घेतला आहे याचे सर्व श्रेय माझ्या कर्जत विधानसभा क्षेत्रातील तमाम शिवसैनिकांना जाते.
- महेंद्र थोरवे (आमदार, कर्जत विधानसभा).