खालापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम


* धो-धो पडणाऱ्या पावसाने पातळगंगा नदी दुथडी

खोपोली / खलील सुर्वे :- जुलै महिन्याला सुरूवात होताच रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज, दि. २२ जुलै रोजी खालापूर तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर कायम असल्याने पातळगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मुसळधार पावसामुळे शाळकरी मुले, नोकरदार आणि नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धरण, धबधबे दुथडी भरून वाहत आहे. तसेच खालापूर तालुक्यातून जाणारी पातळगंगा नदीचे पाणी सावरोली पुलापासून अंदाजे तीन फूट पाण्याची पातळी खाली असल्याने वाहतूक सुरु ठेवण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

संततधार कोसळणार्‍या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खालापूरमधील पातळगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. खोपोली नगरीसह तालुक्यात आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शेतीला पोषक पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. सुट्टीचा दिवस नसल्याने व मुसळधार पाऊस पडत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहेत. तसेच खोपोली शहरातील पावसाआधी पोखण्यात आलेल्या डोंगराची माती सरकत आल्याचे चित्र दिसून येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post