* डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना आमदार करण्यासाठी खालापूरकर एकत्र येणार का?
खालापूर / फिरोज पिंजारी :- 46 वर्षापूवी खालापूर तालुक्याला हक्काचा आमदार व मंत्रीपद मिळाले होते. पण त्यानंतर उरण व कर्जत तालुक्याने मतदार संघाचे नेतृत्व केले. यंदा खालापूर तालुक्याला हक्काचा आमदार मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर तालुक्याच्या अस्मितेसाठी खालापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसह सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, पत्रकार एकत्र येणार का? खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना आमदार करण्यासाठी एकवटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खालापूर तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत तालुका म्हणून प्रसिद्ध असूनही मागील 46 वर्षात तालुक्याचा विकास म्हणावा तसा वेगाने झालेला नाही. तालुक्यात आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी अशा मुलभूत गरजा देखील पूर्ण होतांना दिसत नाही. कधी काळी आशियातील नंबर वन नगर परिषद म्हणून खोपोली नगर परिषद ओळखली जात होती, परंतु नियोजनाअभावी खोपोली नगर परिषदेची अवस्था बिकट झाली आहे. खोपोली शहराचा विकास कासवगतीने सुरू असला तरी या विकासाला गती देण्यासाठी खालापूर तालुक्याचा हक्काचा आमदार असावा, अशी प्रतिक्रिया जनमाणसांतून उमटत आहे.
खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मराठा समाजाचे संयोजक डॉं. सुनील गोटीराम पाटील यांनी खोपोली शहराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खोपोली शहराचा विकास झपाट्याने झाला होता. खालापूर तालुक्यासह कर्जत विधानसभा मतदार संघात देखील विकासगंगा वाहण्यासाठी डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना आमदार करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मागील 46 वर्षापासून खालापूर तालुक्याला हक्काचा आमदार मिळालेला नाही. यंदा खालापूर तालुक्याचा आमदार करण्यासाठी तसेच तालुक्याच्या अस्मितेसाठी खालापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसह सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, पत्रकार एकत्र येणार का? खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना आमदार करण्यासाठी एकवटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.