जलजीवन मिशन योजनेंतर्गत कर्जत तालुक्याची नळ पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न

 



कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्याबाबत आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ जून २०२४ रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय, कर्जत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. 


या बैठकीदरम्यान कर्जत तालुक्यातील मंजूर व प्रगतीपथावर तसेच पूर्ण झालेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यातील जवळपास कर्जत तालुक्यात १२३ योजना मंजूर असून २४ योजना पूर्ण व ९२ योजना प्रगतीपथावर आहेत. या बैठकीत काम करीत असताना व योजना परिपूर्ण करीत असताना तेथील निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, तालुका प्रमुख संभाजीशेठ जगताप, उपअभियंता मिटकरी, शाखा अभियंता सुजित धनगर, करडे व पाणीपुरवठा विभागाचे इतर अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post