* वयाच्या 22 व्या वर्षी खरेदी केली ड्रीम कार
मुंबई / प्रतिनिधी :- स्वत:ची कार असावी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि हेच स्वप्न जर करिअरच्या सुरूवातीस साकार होणे हे फार अवघड आहे. परंतु अभिनेत्री सानिका भोईटे हीने तीच्या मेहनतीच्या बळावर तब्बल 22 व्या वर्षी तीच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, त्यात तिने आईला विचारले...आई तुला यावर्षी माझ्याकडून काय हवे. आईने सांगितले. तू एक 4 व्हिलर खरेदी कर आणि सानिकाने तिच्या आईचे स्वप्न त्याचवर्षाच्या अखेरीस पूर्ण केले.
अभिनेत्री सानिका भोईटेने आजवर पोरी तुझे नादान, भन्नाट पोरगी, हुरपरी, रूप साजरं, तुझी माझी यारी, साज तुझा अश्या अनेक मराठी गाण्यांमध्ये अभिनय केला आहे. तीच्या सर्वच गाण्यांचे व्ह्यूज हे मिलीयन पार गेले आहेत. सध्या तीचे इंस्टाग्रामवर 1 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तर तिच्या युट्यूब चॅनेलवर 200 हजार सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर तीचा फार मोठा चाहतावर्ग देखील आहे.
अभिनेत्री सानिका भोईटे तीच्या करिअरविषयी सांगते, मी साता-यातील फलटण या गावातून पुणे येथे शिक्षणासाठी एकटीच आले. पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून 2022 मध्ये बॅचलर इन बिजनेस अॅडमिनीस्ट्रेशनचे माझे पदवी शिक्षण पूर्ण केले आणि आता मी पुण्यातच राहते. माझे शिक्षण सुरू असताना, मला ग्लॅमरस बॉलीवूड जगाची भुरळ पडली. मी वयाच्या 18 व्या वर्षापासून इंस्टाग्रामद्वारे तब्बल 22 पेक्षा जास्त मोठ्या ब्युटी ब्रॅंडसोबत कामे केली. शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखिल काम केले. त्यात सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे आपण आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. हा प्रवास सोप्पा नव्हता. परंतु मी कायम प्रामाणिक प्रयत्न करेन. भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सिरीजमध्ये काम करायला नक्की आवडेल.