ठाणे / प्रतिनिधी :- एन फिल्म प्रोडक्शन व काशिनाथ फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सिने कलागौरव पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक दिव्य मराठीचे शाहिद पठाण,पत्रकार संघ सदस्य शिवाजी गायकवाड, अभिनेत्री उज्वला वर्मा, अभिनेत्री सायली ढवण, अभिनेते निर्माते काशिनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सायली ढवण यांना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत सायली ढवण हिने मराठी शॉर्ट फिल्म व वेब सिरीजमध्ये काम केले आहे. काही व्हिडिओ रील्स आणि आताच तिला एक बिग मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ती अभिनेत्री म्हणून काम करीत असताना घरची सुद्धा एक मोठी जबाबदारी पार पाडत आहे. त्याचबरोबर फॅमिली, सामाजिक क्षेत्र, कलाक्षेत्र या सर्व जबाबदारी पार करून आपलं करिअर करण्यासाठी ती चित्रपट क्षेत्रांमध्ये वावरत आहे. तिच्या या कामाची दखल राष्ट्रीय चिन्ह कलाकार पुरस्कार सोहळा या आयोजकांनी घेतली आणि तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातून गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नाशिक, मुंबई, नगर, कोल्हापूर येथील कलाकारांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.