'केपीएल' क्रिकेट स्पर्धेत व्हॉईस ऑफ मिडीयाचा डंका

* खोपोली पत्रकार क्रिकेट संघ चषक 2024 

* खोपोली पत्रकार संघाचे उत्कृष्ट नियोजन 



खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- खोपोली, खालापूर, कर्जत तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित आणणे...पत्रकारांचा स्वाभिमान जोपासणे...पत्रकारांचे मनोरंजन करणे, या उदात्त हेतूने 'खोपोली पत्रकार क्रिकेट चषका'चे आयोजन पत्रकार आकाश जाधव, तय्यब खान, अनिल वाघमारे, अरुण नलावडे, महेबुब जमादार, संतोष गोतारणे आदींनी केले होते. या स्पर्धेला पत्रकार, आजी-माजी नगरसेवक, डॉक्टर असोसिएशन, खोपोली नगर परिषद कर्मचारी, खोपोली - खालापूर पोलिस कर्मचारी व क्रिकेट रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खोपोली नगर परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्या संघाला राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे व खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील 'व्हॉईस ऑफ मिडीया' या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या संघाने नमवित विजय नोंदविला. या स्पर्धेत 'साप्ताहीक खालापूर वादळ'चा कार्यकारी संपादक फैजान खलिल सुर्वे उत्कृष्ट फलंदाज ठरला तर सुबोध भोसले उत्कृष्ट गोलंदाज ठरला. 


दरम्यान, सुरूवातीला खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, माजी नगरसेवक अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरूण गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करीत तसेच पिच पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. 

यावेळी माजी नगरसेवक नरेश जाधव, नितीन मोरे, दिनेश थोरवे, सचिन मोरे, राकेश शेलार, प्रदिप मोरे, जेष्ठ पत्रकार जयवंत माडपे, अरूण नलावडे, दिनेश पाटील, सागर जाधव आदी उपस्थित होते. या स्पर्धेत व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेचे दोन संघ सहभागी झाले होते. माजी नगरसेवक, डॉक्टर असोसिएशन, खोपोली-खालापूर पोलिस कर्मचारी, खोपोली नगर परिषद कर्मचारी व अधिकारी संघ, खालापूर प्रेस क्लब व खोपोली पत्रकार संघाचे संघ सहभागी झाले होते. सर्वांनी उत्कृष्ट खेळ करीत भरपूर मनोरंजन केले. 



अंतिम सामना खोपोली नगर परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्या संघाला राष्ट्रीय महासचिव खलील सुर्वे व खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील 'व्हॉईस ऑफ मीडिया' या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या संघाने झाला. यात 'व्हॉईस ऑफ मीडिया' या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या संघाने खोपोली नगर परिषद कर्मचारी व अधिकारी संघाला नमवित विजय नोंदविला. या स्पर्धेत 'साप्ताहीक खालापूर वादळ'चा कार्यकारी संपादक फैजान सुर्वे उत्कृष्ट फलंदाज ठरला तर सुबोध भोसले उत्कृष्ट गोलंदाज ठरला. 


Post a Comment

Previous Post Next Post