संपादक फिरोज पिंजारी राष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित


* उत्कृष्ट पत्रकारितेसाठी अभिनेते धिरज कुमार, टिनू वर्मा, गायक विजय बेनडिक्ट यांच्या हस्ते गौरव


मुंबई / खलील सुर्वे :- केपी न्यूज चैनल ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडचे दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, कोकण प्रवाह, इंटरपोल, केपी न्यूज चैनल व वेब पोर्टलचे संपादक तथा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, पोलिस मित्र संघटनेचे प्रदेश महासचिव फिरोज पिंजारी यांच्या कार्याची दखल घेत शो-थिम प्रोडक्शन हाऊसच्या वतीने युवा संपादक, बेस्ट एडीटर या क्षेत्रातील 'राष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड'ने त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते, डायरेक्टर धिरज कुमार, मेला फेम अभिनेते गुज्जर अर्थात टिनू वर्मा, डिस्को डान्सर गाण्याचे गायक विजय बेनडिक्ट, शो-थिम प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख संजीव कुमार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन संपादक फिरोज पिंजारी यांना गौरविण्यात आले. 


मागील 14 वर्षापासून फिरोज पिंजारी पत्रकारीता करीत आहेत. पत्रकारीतेतील पदव्युत्तर पदवी घेत आपल्या लेखणीद्वारे अनेकांना न्याय मिळून दिला आहे. त्यांच्या बातम्या या इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीच्या मानल्या जातात. त्याचबरोबर सध्या ते दैनिक कोकण प्रजा नामक हिंदी वृत्तपत्र व दैनिक कोकण प्रदेश नामक मराठी वृत्तपत्र चालवित असून सोबतच कोकण प्रवाह, कोकण प्रजा, इंटरपोल, केपी न्यूज चैनल व वेब पोर्टलचे देखील संपादक आहेत. तसेच पत्रकारांसाठी मागील 8 वर्षापासून विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचा लढा अविरत सुरू आहे, या सर्व कार्याची दखल घेत शो-थिम प्रोडक्शन हाऊसच्या वतीने युवा संपादक, बेस्ट एडीटर या क्षेत्रातील 'राष्ट्रीय अचिव्हर्स अवॉर्ड'ने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

'केपी न्यूज चैनल'चे संपादक फिरोज पिंजारी आपल्या परखड व स्पष्ट, रोखठोक बातम्यांसाठी प्रसिद्ध आहेत. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट बातम्या समाजासमोर मांडणे व आपल्या लेखणीतून सामाजिक बांधिलकी जपत नि:ष्पक्षपाती राहून सर्व समाज बांधवांच्या अनेक समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांना मोलाचे सहकार्य करून ते खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतात व पत्रकारांना मदतीचा हात पुढे करतात. त्यांच्या अश्या अनेक उल्लेखनीय कामांची दखल घेत सन्मानित  करण्यात आले.

राजकीय, सामाजिक, उद्योजक, प्रभावशाली, मिडीया, रिअल इस्टेट, कलाकार, जीवनशैली, चित्रपट निर्माते, संगीत दिग्दर्शक, डॉक्टर, हॉस्पिटॅलिटी व्यवसाय मनोरंजन व्यवसाय, डिझाइनर, ब्लॉगर्स, अभिनेते, हॉटेलियर्स, स्टार्टअप्स, ब्रँड, मेकअप आर्टिस्ट अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना व्यक्तींना देखील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post