खोपोली पोलिस ठाण्यातील पोलिस भगिनींसाठी हळदीकुंकू

   * दक्षता सेवा फाउंडेशनचा उपक्रम   




खोपोली (जि. रायगड) / किशोरी चेऊलकर :-
  शनिवार, दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी रथसप्तमीच्या मूहूर्तावर  दक्षता सेवा फाउंडेशन रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोली पोलिस ठाण्यातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सुरुवात नव्याने हजर झालेल्या महिला पोलिस निरीक्षक पूजा चव्हाण यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन वाण आणि अल्पोपहार देण्यात आला.   पोलिस कर्मचारी यांची एसएससी परीक्षा उत्तीर्ण मुलांना बक्षिसे देण्यात आली. पोलिस महिलांना विरंगुळा व आनंद मिळावा यासाठी ठराविक अंतरावरून बाॅल बादलीत एक टप्पा पाडून टाकणे हा खेळ घेण्यात आला. या खेळात प्रथम क्रमांक सौ. वैशाली कातुरडे यांचा, द्वितीय क्रमांक पोलिस निरीक्षक पूजा चव्हाण यांचा तर तृतीय क्रमांक दिव्या देशमुख यांनी पटकावला, उत्तेजनार्थ ऋषी गौतमी गायकवाड यांचा आला. सगळ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. महिला पोलिसांनी या हळदीकुंकू समारंभाचा मनापासून आनंद लुटला. कार्यक्रमास अल्पोपहाराची व्यवस्था स्वखर्चाने दक्षता सेवा फाउंडेशन खालापूर तालुका संपर्क प्रमुख दिनेश महाडिक यांनी केली.   हळदीकुंकू समारंभाला लागणारे साहित्य सदस्या भारती शहा यांनी स्वखर्चाने केली. मुलांची व खेळाच्या बक्षिसांचा खर्च संस्थापक उपाध्यक्षा कविता खोपकर यांनी केला. संस्थेच्या वतीने हळदीकुंकू वाणांचा खर्च करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीसाठी रजनी म्हामूणकर, रायगड जिल्हा सचिव, भारती शहा, कविता खोपकर, केतन खोपकर, रमाकांत म्हामूणकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास वर्षा मोरे, भारती पाटील, संगीता पाटील, राजश्री पाटील, किशोरी चेऊलकर, संगीता विचारे, हेमलता कर्णूक , करूणा सावंत उपस्थित होत्या. शेवटी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल दक्षता सेवा फाउंडेशनच्या वतीने कविता खोपकर यांनी आभार मानले आणि विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक पूजा चव्हाण, प्रांजलीताई पाटील आणि सर्वच महिलांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post