वैद्यकीय उपकरणांचे आणि पोलिसांना बँरीकेडर्सचे वाटप

* डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम 

खालापूर / प्रतिनिधी :- जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्रथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपकरणे तसेच खोपोली पोलिस ठाण्यासाठी १०० बँरीकेडर्सचे वाटप नुकतेच महाराजा मंगल कार्यालयात करण्यात आले. यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलिस निरीक्षक शीतल राऊत, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, खोपोली डाँक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉं. सतीश जाखोटीया, सेक्रेटरी डॉं. नलीन शहा, नायब तहसीलदार विकास पवार, वैद्यकीय अधिकारी डॉं. अनिल कुमार शहा, डॉं. सूरज तडवी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम साबळे आदी उपस्थित होते.   

डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपत रूग्णालयात ते स्मशानभूमीची स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. तीन ते चार लाख वृक्षारोपण केले आहे. शालेय वस्तूचे वाटप करीत असल्याची माहिती श्री सदस्य अविनाश मोरे यांनी प्रास्ताविकातून दिली.

खालापूर प्राथमिक वैद्यकीय आरोग्य केंद्रात महिलांची प्रसुती केंद्र सुरू केले आहे. डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिलेले वैद्यकीय उपकरणांचे उपयोग होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉं. अनिल कुमार शहा यांनी सांगितले. तर श्री सदस्य समर्पक भावनेतून काम करीत आहेत, याची प्रचिती येत आहे. भविष्यात रायगड जिल्ह्यात, खोपोली शहरात आरोग्य शिबीर राबविण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन खोपोली डाँक्टर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉं. नलीन शहा यांनी दिले.       

वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या असताना वाहतुक पोलिसांची संख्याबळ नसते. या दरम्यान बँरीकेडर्स लावले असतील नक्कीच पोलिस पुढे असतील, असा समज वाहन चालकांचा समज होतो म्हणूनच पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी २५ बँरीकेडर्सची डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडे मागणी केली होती. परंतु प्रतिष्ठानने तब्बल १०० बँरीकेडर्स दिल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी आभार व्यक्त मानले. अपघात घडल्यावर जखमींना पहिल्यांदा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ पाठविले जाते, परंतु शासकीय रूग्णालयात व्यवस्था नसेल तर एखादा रूग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु डॉं. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिलेले वैद्यकीय उपकरणांचा रूग्णांना उपयोग होणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post