वनवे गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीभावात संपन्न

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात तसेच खोपोली शहरात रामभक्त हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. वनवे गावात देखील चौदाव्या वर्षी हा जन्मोत्सव गावातील ग्रामस्थ, महिला व नवतरुण मंडळाकडून साजरा करण्यात आला.

शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी श्री भैरवनाथ मंदिर येथे पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान काकड आरती झाली. मनेष जोगावडे, उद्धव घोलप, राजू पारठे, मच्छिंद्र पारठे व गावातील ग्रामस्थ यांच्यावतीने आरती करण्यात आली. हनुमान जन्मोत्सव अभिषेक ग्रामस्थ पंच कमिटी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा सत्यनारायणाची महापूजा हभप विश्वास सखाराम पारठे, दमयंती विश्वास पारठे यांच्या हस्ते संपन्न झाले. दुपारी तीन ते चार हभप काशिनाथ महाराज वाघोले यांचे हनुमान जन्मोत्सवनिमित्त सुश्राव्य प्रवचन झाले.

पाच ते सहा दरम्यान सामुदायिक हरिपाठ झाले, ज्याचे नेतृत्व पुंडलिक पारठे, राजू पारठे, उद्धव घोलप, कानिफनाथ पारठे, जगन्नाथ जोगावडे, योगेश पारठे‌ व ग्रामस्थ महिला यांनी केले. भक्तगण शक्ती व भक्तीचे प्रतीक श्री हनुमान यांच्या भक्तीत तनामनाने तल्लीन होऊन श्रींच्या पालखीचा आस्वाद घेत होते. हा पालखी सोहळा संपूर्ण गावातून फटाकाच्या आतिशबाजीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

यानंतर रात्री महाप्रसाद व मिष्टान्न अन्नदान खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश सखाराम पारठे यांच्यातर्फे देण्यात आले. यावेळी पोलीस पाटील मनोज पारठे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक सुधीर गोविंद माने, संतोष पारठे, गटनेते किशोर पवार, पांडुरंग गोविंद मगर, संदिप पवार, ज्ञानेश्वर पारठे, शांताराम पारठे, संतोष मगर, पांडुरंग मगर, ग्रामस्थ महिला आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. पालखी सजावट राजेश जाधव व नरेश उतेकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी पिण्याचे पाण्याचे जारची सोय चंद्रकांत मिसाळ यांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post