नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर 10 मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रायगड / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुकतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.


ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा https://ibpsonline.ibps.in/igrosfeb२५  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या https://rfd.maharashtra.gov.in  आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर 22 एप्रिलपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची 10 मे 2025 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत आहे. एकूण रिक्त पदे- 284 असून माजी सैनिकांसाठी एकूण 43 जागा राखीव आहेत. तरी रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post