चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात महिला दिन साजरा

चोपडा / महेश शिरसाठ :- ज्येष्ठ नागरिक संघात ८ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी छायाबेन गुजराथी तर प्रमुख पाहुणे मोहिनी उपासनी, दिपाली ‌सांळूखे, डॉं. स्मिता पराग पाटील यांचे स्वागत महिला फेस्काम अध्यक्षा ताराताई, राधा देशमुख, कुंदा डोंगरे, बडगुजर यांनी केले. महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिला संगिता भालेराव, अर्चना पाटील, डॉं. स्मिता पराग पाटील, निला पाटील, सुनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, सहसचिव अभि विलास एस पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी अध्यक्ष करोडपती, शामभाई गुजराथी, प्रमोद डोंगरे, गोकुळ पाटील, शांताराम पाटील, एम. डब्यू. पाटील, सुनेत्रा कुळकर्णी, सुनिता कुळकर्णी, एस. टी. बडगुजर, कुळकर्णी सर, सुमंत कुळकर्णी, सुभाष पाटील, एन. डी. महाजन, कौशल्याताई महाजन, बेबाताई बाविस्कर आदींसह ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक व सभासद यांची उपस्थिती होती. उपासनी मॅडम, साळूंखे मॅडम, डॉं. स्मिताताई यांनी महिलांना सध्याचे परिस्थितीत कसे जगावे व सुसंस्कृत पध्दतीने वागावे अनेक उदाहरणे देऊन उद्बोकीत केले. आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. आभार सुनिता राधेश्याम पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post