चोपडा तालुक्यात आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रेशन कार्डधारक पात्र महिलांना साडी वाटपाचा शुभारंभ

* १० हजार २६९ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

चोपडा / महेश शिरसाठ :- महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमाने चोपडा तालुक्यासाठी पात्र १० हजार २६९ रेशनकार्ड लाभार्थ्यांसाठी शासनातर्फे साड्यांचे वितरण करण्यात येत आहे .चोपडा विधानसभा मतदारसंघ आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात साड्यांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

याप्रसंगी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, पुरवठा तपासणी अधिकारी किरण मेश्राम, गोदाम व्यवस्थापक योगेश ननवरे, पुरवठा निरीक्षक मेघना गरुड, सभापती नरेंद्र पाटील, घनश्याम अग्रवाल, शिवराज पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, किशोर चौधरी, विकास पाटील, राजेंद्र जैस्वाल, मेहेमुद बागवान, ए. के. गंभीर, महेंद्र धनगर, दिपक चौधरी, मंगल कोळी, प्रविण कोळी, किशोर पाटील, दिव्यांक सावंत, प्रदीप बारी, बबलू पालीवाल, संदीप पाटील, दशरथ बाविस्कर, सुनिल बरडीया, मंगलाताई पाटील, कल्पनाताई पाटील,  मनिषाताई पाटील, स्वातीताई बडगुजर, अनिताताई शिरसाठ, शितलताई देवराज, नंदु गवळी, कैलास बाविस्कर, सचिन महाजन, अनुप जैन, शिवाजी कोळी, गजानन कोळी, हरिष पवार आदी उपस्थित होते.  

तरी शासनाच्या वतीने पात्र लाभार्थीं महिलांना जागतिक महिला दिन तसेच होळीनिमित्त साडी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने चोपडा तालुक्यात दहा हजार दोनशे एकोंसत्तर साड्यांचा लाभ महिला घेणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post