धुलीवंदननिमित्त बापूजी देवपूजा व आरती


बारामती / अक्षय कांबळे :- नवसाला पावणारा बापूजी देव, अशी कटफळ येथील देवाची ओळख आहे. बारामती तालुक्यातील कटफळ गावामध्ये एक छोटेसे असे मंदिर आहे. मंदिरात धुलीवंदन दिवशी भाविकांची गर्दी होते.

मागील चार पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा दरवर्षी लोणावळा खंडाळा घाट येथे मेन ठाण असलेल्या मंदिर परिसरात गुढीपाडवाच्या दिवशी मोठी यात्रा भरते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, अशी प्रतिक्रिया उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. 

या देवाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा विश्वास आहे. आज धुलीवंदन दिवशी देवाला कोंबडा आणि नैवैद्य तसेच आरती होते. ही परंपरा आजही पूर्ण करण्यात आली. अमोल पांडुरंग लोंढे, उज्वला अमोल लोंढे, महादेव नाना कांबळे,  सुरेखा ज्ञानेश्वर सोंडे, वैशाली महादेव कांबळे, अक्षय महादेव कांबळे, ओम बाबू कांबळे आदींनी देवाची पूजा केली.

Post a Comment

Previous Post Next Post