* भ्रष्टाचाराला लागला वास,चोरांचा झाला सुळसुळाट
खालापूर / रविंद्र जाधव :- खालापूर नगरपंचायतीमध्ये कोणाचाही धाक, दबाव असा राहिलेला नाही. कारण मुळातच जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत, त्यांनाच कायद्याचा व सामाजिक क्षेत्राचा अभ्यास नाही. नुसते नगरसेवक म्हणून नावासाठी गेलेले आहेत. हे प्रकार अगोदर देखील झालेले आहेत. मागच्यावेळी सुध्दा चोराने चोरी केली त्यावेळी जर त्याला कठोर शिक्षा केली असती तर पुन्हा त्याने डोके वर काढले नसते. आपलेच प्रतिनिधी त्या चोरांना साथ देऊन अट्टल गुन्हेगार बनवत चालले आहेत. खालापूर ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीचा स्वच्छ, सुंदर असा कारभार होता. जनतेचा त्या प्रतिनिधीवर लक्ष असायचा, शिवाय ग्रामपंचायतीची ग्रामसभा असल्याने सर्वसामान्यातील सामान्य माणसाला त्या सभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार होता.
सदस्याने जर काम नाही केले तर त्याच्यावर कारवाईची नोटीस निघत होती. भ्रष्टाचार कमी व्हायचा हे नक्की ? पण खालापूर नगर पंचायत झाल्याने येथील कारभार हा बदलला आहे. नियम हे अतिशय जाचक असल्याने तो माणूस पुन्हा जात नाही. त्यांची कौन्सिल (council) असल्याने त्या कौन्सिलला नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याशिवाय कुणी बसू शकत नाही. म्हणजे त्या सर्वसाधारण सभेमध्ये काय झाले कोणी कोणते प्रश्न विचारले याचा थांगपत्ता नसतो. म्हणून लोकांची गळचेपी होते. गेल्या प्रकरणापासून खालापूर नगर पंचायत चांगलीच नावारूपाला आली आहे. तालुक्याची ग्रामपंचायत आदर्शवत पाहिजे होती तर तिचे नाव ब्लॅंकलिस्टवर झळकत आहे. प्रशासनावर कोणत्याही प्रतिनिधीची पकड नसल्याने असे प्रकार घडत आहेत. जर पुन्हा असेच प्रकार घडत असतील तर कमिटी बरखास्त करून प्रशासनाच्या हातात नगर पंचायतीचा कारभार द्यावा, अशी मागणी खालापूर नगर पंचक्रोशीतून होत आहे.
