चोपडा / प्रतिनिधी :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा चोपडा व ग्राहक कल्याण फाऊंडेशन चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकिय इमारत, तहसिल कार्यालय, मिटींग हॉल, चोपडा येथे जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहक जागृती याविषयी खास मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे हे करणार असून प्रमुख पाहूणे म्हणून उदयकुमार श. अग्निहोत्री (जिल्हाध्यक्ष, प्र. म. अ. सदस्य, जि. ग्रा. पं. स.), राजेश रामदास गुजराथी (तालुका अध्यक्ष, प्रवासी महासंघ), घनश्याम चंद्रकांत वैद्य (सचिव, प्रवासी महासंघ), इंदिरा बापू सोनवणे (सदस्य), डॉं. पृथ्वीराज अमृत सैंदाणे (तालुका उपाध्यक्ष, ग्राहक पं. म. शाखा चोपडा), योगेश रमेश शिंपी (सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा), जयश्री राजेश खैरनार (सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा), भालचंद्र साळुंखे (सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा), विकास महाजन (अशासकीय सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय, मुंबई), कैलास शामराव महाजन (जि. उपाध्यक्ष, प्र. म. अ. सदस्य, जि. ग्रा. पं. स.), भोजराज लक्ष्मणदास पोतदार (तालुका उपाध्यक्ष, प्रवासी महासंघ), अरुण गोपीलाल अग्रवाल (सदस्य, प्रवासी महासंघ), राजेश पंडीत खैरनार (तालुका अध्यक्ष, ग्राहक पं. म. शाखा चोपडा), अनिल भिका बारी (सचिव, ग्राहक पं. म. शाखा चोपडा), अतुल सुधाकर शिंपी (सदस्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा), लता अशोक खैरनार (सदस्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा), यशवंत बोरसे (सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा चोपडा) आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पुरवठा निरीक्षण अधिकारी किरण डी. मेश्राम, पुरवठा निरीक्षक मेघना गरुड, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नावरे यांनी केले आहे.