हा केवळ रंगांचा नाही, तर विचारांचा उत्सव

* आ. महेंद्र थोरवे : बु'ज हास्य परिवाराच्या होळी व धुलीवंदन कार्यक्रमास खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खोपोली / प्रतिनिधी :- धुलीवंदन हा केवळ रंगांचा नाही, तर विचारांचा उत्सव आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, हास्य परिवाराच्या या रंगोत्सवात सहभागी होणे नेहमीच आनंददायक असते. बु'ज हास्य परिवार हा माझ्या कुटुंबासारखा आहे. या ठिकाणी येताना नेहमीच कुटुंबासारखा आत्मीयतेचा अनुभव येतो. बाबुभाई आणि संपूर्ण हास्य क्लबने या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हास्य हेच सर्वात उत्तम औषध आहे. निरोगी आणि आनंदी जीवनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. हा कार्यक्रम म्हणजे केवळ रंगांची होळी नसून विचारांचीही होळी आहे, जी सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचा संदेश देते, असे ही आ. थोरवे म्हणाले. 


खोपोली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या बु'ज हास्य परिवाराच्या होळी व धुलीवंदन कार्यक्रमास खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अध्यक्ष हास्य बु'ज क्लबचे बाबूभाई ओसवाल, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, उद्योजक सुनील गुप्ता, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिपेंद्र बडोरिया, शिवसेना संघटक तात्या रिठे, हास्य क्लबच्या शोभा धायगुडे, लायन्स क्लब सदस्य अल्पेश शहा व खोपोली शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, हास्य क्लबचे सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Post a Comment

Previous Post Next Post