* होळीच्या रंगात मनोरंजन, नृत्य अश्या संगीतमय क्षणांचा अनुभव - धैर्यशील नागवडे
पनवेल / साबीर शेख :- होळी सण वसंत ऋतूचा प्रारंभ. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने पनवेल येथील निसर्ग गार्डन फॅमिली रेस्टॉरंटच्या वतीने होळी रंग बरसे या होळी सेलिब्रेशनचे सुंदर नियोजनबद्ध असे आयोजन करण्यात आले होते.
सलग दुसऱ्या वर्षीच्या परंपरेप्रमाणे या जल्लोषात सहभागी होण्यासाठी हजारो युवक तसेच देशविदेशी पर्यटकांनी लाईव्ह डीजेच्या तालावर रेन डान्स करून मनमुरादपणे निसर्ग हॉटेल व्यस्थापनाच्या उत्तम दर्जेदार स्वादिष्ट खाद्य संस्कृतीचा आनंद लुटला. हजारो युवक व शेकडो परिवारांनी आपल्या सदस्यांसोबत रंगांची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला. हा सण उत्सव प्रेम, सौहार्द आणि एकता दर्शवतो त्यामुळे दुष्ट विचारांना मागे टाकून नवे उमेदने आनंददायी जीवन जगू व खाद्य संस्कृतीच्या सेवेत निरंतर खवैय्यांची सेवा करू, असे प्रतिपादन व्यवस्थापक मालक धैर्यशील नागवडे यांनी करून होळी सेलिब्रेशन २०२५ यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सर्वांचे धैर्यशील नागवडे यांनी आभार मानले.
