वसमत / प्रतिनिधी :- डॉं. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, मुख्याध्यापक शेख मोईन मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक पाईकराव हे होते. प्रमुख पाहुणे वंजारे सचिन हे होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता आपले काम शेवटच्या श्वासापर्यंत केले. तेही अशा काळात जेव्हा माणूस म्हणून जगण्याची मुभा नव्हती. ज्यांनी स्त्रियांना नवी ओळख निर्माण करुन दिली. यावेळी सय्यद मजर सय्यद इब्राहिम, अल्फिया मोहम्मद शकील कुरेशी, शेख अब्दुल शेख रिजवान, मनस्वी दातार, मनीषा गायकवाड जाधव, शिवशंकर, प्रकाश कदम, शिवाजी शिंदे, तोनसुरे बसवेश्वर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सचिन सपकाळ यांनी मानले.
