* महिला दिनापासून महिलेच्या माध्यमातून महिलांसाठी सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम
* आत्करगाव येथील प्रणाली आकाश सावंत ठरल्या या उपक्रमाच्या पहिल्या मानकरी
* उपक्रम प्रमुख सागरिका जांभळे यांच्या कल्पक विचारातून सातत्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
खोपोली / प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपोली विभागात जन्मास येणाऱ्या कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातेचे अभिनंदन व कौतुक उपक्रमाचे आयोजन 8 मार्च 2025 पासून प्रारंभ सुरु करण्यात आला. खोपोली हद्दीतील दवाखान्यात कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातेचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्याच्या उपक्रमाची सुरुवात 9 मार्च 2025 रोजी ताज हॉस्पीटल खोपोली येथे आत्करगाव येथील प्रणाली आकाश सावंत यांनी जन्म दिलेल्या कन्येला व कुटुंबियांना शुभेच्छा देऊन सदर मातेस अभिनंदन पत्र व लक्ष्मीची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रणाली सावंत यांचे कुटुंबीय, ताज हॉस्पिटल स्टाफ व योगिता जांभळे उपस्थित होते.
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. महिलांच्या जीवनात आलेल्या या नव्या सुखासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतांना मातृत्वाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असो ही प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. आई होणे म्हणजे प्रेम, त्याग आणि आनंदाचे अनोखे मिश्रण असुन आयुष्यात आलेल्या या गोड कन्येसोबत प्रत्येक दिवस सुंदर आणि संस्मरणीय ठरो याचसोबत आई म्हणून आपल्या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देणारा हा उपक्रम समाजासाठी ऊर्जादायी ठरेल, असा आशावाद सहज सेवा फाउंडेशनच्या उपक्रमात पहिल्या 50 जन्माला येणाऱ्या कन्येसाठी लक्ष्मी फ्रेम उपलब्ध करून देणाऱ्या आंबिवली - माजगाव येथील सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी व यशस्वी महिला उद्योजक कमल रमाकांत जाधव यांनी केले आहे.
सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्ध असणारे समाजसेवक डॉं. शेखर जांभळे यांची लहानपणापासून वडिलांसोबात सामाजिक कार्यात सक्रिय असणारी कन्या सागरीका योगिता शेखर जांभळे केएमसी कॉलेजची विद्यार्थिनी असुन लिओ क्लब ऑफ वाशी वर्चूस व रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली या जगप्रसिद्ध सामाजिक संस्थेची देखील पदाधिकारी तसेच सहज सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपक्रम प्रमुख म्हणुन नेतृत्व करीत आहे. महिला दिनी महिलेच्या माध्यमातून महिलांसाठी सातत्यपूर्ण आयोजित होत असलेल्या व कन्यारत्नास जन्म देणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

