* काँग्रेस पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्याकडून पदयात्रेचे स्वागत
पनवेल / साबीर शेख:- आम्हाला रोजगार हवा...कायदा सुव्यवस्था राबवून महिला अत्याचार आणि गुन्हेगारी थांबवा...जातीयवादी धोरणे नष्ट करा...शेतकऱ्यांना हमी भाव द्या...आम्ही आमचे हक्क घेऊनच राहणार, अशा दृढ संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली "युवा आक्रोश यात्रा" मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे येथून १६ तारखेला ही पदयात्रा काढण्यात आली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी व युवकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी ही यात्रा मुंबईकडे निघाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवा आक्रोश पदयात्रेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. युवकांसाठी केवळ घोषणा न करता ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात हा युवा मोर्चा विधान भवनाला घेराव घालवण्यासाठी...तसेच जुलमी सरकारला जागे करण्यासाठी काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी स्वतःला बेडीत जखडत कुणाल राऊत यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले व युवकांनी परत एकदा काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी येणारा काळ युवकच बदलू शकतात म्हणून युवकांनी काँग्रेस पक्षाला संघटनात्मक बळ देऊन जुलमी सरकार विरोधातील लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी अजय छिकारा, एहसान खान, राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, स्वप्नील पाटील, प्रिंतेश शाहु, राहुल माणिक, अजित सिंह, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, संघटन प्रमुख श्रीनिवास नालमवार, प्रदेश सचिव अभिजीत अंकलकोटे, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव व पदयात्रेत उपस्थित पक्षनेतृत्वाचे पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जोरदार स्वागत करून शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगजी, वैभव पाटील, प्रशांत गायकवाड, माजी नगरसेविका शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे, डॉं. शिल्पा ठाकूर, राकेश चौहान, मनोज बिराजदार तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
