एचएसआरपी नंबर प्लेट बसविणारे गुन्हेगार ?

* सिमरन मोटर्स सेंटरवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना “तारीख पे तारीख"

* एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी नागरिकांना मारावे लागतात सेंटरवर हेलपाटे?

* राज्य परिवहन आयुक्त वाहन धारकांच्या तक्रारीची  दखल घेणार का? 

खोपोली / खलील सुर्वे :- उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) ही वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी भारत सरकारने लागू केलेली एक अनिवार्य योजना आहे. एचएसआरपी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, ज्यामध्ये एक अद्वितीय सिरीयल नंबर आणि न काढता येणारे लॉक असते. चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षिततेच्या उद्देशाने ही नंबर प्लेट महत्त्वाची आहे. भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे.

एचएसआरपी बुकिंगची प्रक्रिया राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलद्वारे किंवा अधिकृत विक्रेत्यांद्वारे केली जाते. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची मोहीम वाहनांच्या ऑनलाईन नोंदणीअभावी मंदावली आहे. परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ही नंबर प्लेट अनिवार्य केली असून, यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील पनवेल भागात देण्यात आलेल्या सिमरन मोटर्स या सेंटरवर नंबर प्लेटसाठी अर्ज करणाऱ्या वाहनधारकांना “तारीख पे तारीख” मिळत असून ठरलेल्या दिवशी गेल्यावर नंबर प्लेट अजून आलेली नाही, आल्यावर बसवून देतो...पोर्टल बंद आहे, कामगार सुट्टीवर आहे, सध्या गर्दी आहे, अशी उत्तरे मिळत आहेत. यामुळे नागरिकांना सेंटरचे हेलपाटे मारावे लागत असून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर वाहन धारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पनवेलमध्ये येणारे सिमरन मोटर्स या सेंटरची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) मिळवण्यासाठी वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑनलाईननुसार नंबर प्लेट बसविण्यासाठी सिमरन मोटर्स या सेंटरवर मिळालेल्या अपार्टमेंटनुसार वाहन धारक गेल्यास स्टाफकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नंबर प्लेट अजून आलेली नाही, तुम्ही आम्हाला कशाला सांगता जी एजन्सी नंबर प्लेट बनवते त्यांना जावून सांगा, आमचे काम फक्त नंबर प्लेट बसून देण्याचे आहे...बाहेर लिस्टमध्ये तुमच्या वाहनचे नंबर आले आहे का बघा...आम्हाला दुसरे काम नाही का ? तुम्हाला दंड बसतो म्हणून आता नंबर प्लेट लावण्यासाठी येता...आता नंबर प्लेट बसून मिळणार नाही, पोर्टल चालत नाही, ऑनलाईन फार्मवर दिलेल्या नंबरवर फोन करून या, दोन महिन्यांची मुदत आहे...आपल्या सेंटरचा दिलेल्या फोन नंबरवर फोन केल्यावर फोन उचला जात नसल्याचे सांगताच उध्दट भाषेचा वापर करून आम्ही त्याला काय करणार असे उत्तर देण्यात येत आहेत. आम्ही ऑनलाईन केलेल्या अर्जानुसार ठरलेल्या वेळेत त्या दिवशी नोकरी, कामधंदाची सुट्टी घेऊन 40-50  किलोमीटरहुन डिझेल, पेट्रोल, टोलचा खर्च करून येतो आणि सेंटरचे हेलपाटे मारून "तारीख पे तारीख” घेऊन निघून जायचे का? आम्हाला येण्या-जाण्यासाठी खर्च लागत नाही ? असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे. संबंधित एजन्सीकडून वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर राज्याच्या परिवहन आयुक्तांनी वाहन धारकांच्या तक्रारीची दखल घ्यावी व संबंधित एजन्सीवर कार्रवाई करावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post