भोंगऱ्या देवाच्या पूजनाने उत्सवास प्रारंभ

* आदिवासी नृत्यावर माजी आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी  धरला ठेका

चोपडा / महेश शिरसाठ :- उनपदेव येथे भोंगऱ्या आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मा. आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची (बोपदेव) पूजा करून शुभारंभ करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार उनपदेव अडावद येथे भरतो. लाखोंच्या वर यात्रेकरू व शेकडों ढोल पथक व पाड्या, वाड्या वस्त्यावरून लाखो आदिवासी बंधूभगिनीं अबालवृद्ध उपस्थित होते. ढोलाच्या सुमधुर नाद निनादत होता. त्यात भान हरपून आदिवासी नृत्य करताना दिसत होते.  तसेच वर्षभरातून एकदा या बाजारातून अनेक चीज वस्तू खरेदी करीत आहेत. 

१० रोजी दुपारी बारा वाजता शरभंग पाडा येथे भोंगऱ्या उत्सवाचा प्रारंभ माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची (बोपदेव) पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, अनिता भिलाला, शरभंग पाड्याचे पोलिस पाटील देवासिंग जामसिंग पावरा,  संजीव पांडूरंग शिरसाठ आदिवासी समाज सेवक चोपडा, किरण देवराज संचालक कृऊबासं चोपडा, गाव डाया गजीराम पावरा, शेवरे बुद्रुकचे पोलिस पाटील गणदास बारेला, सचिन महाजन, हरीश पाटील, पत्रकार रफिक मण्यार, पी. आर. माळी, रायसिंग पावरा, मेंबर खुमसिंग बारेला, टुबासिंग पावरा, नरसिंग बारेला, जगन बारेला, भागीराम बारेला, कनसिंग बारेला, रमेश बारेला, ताराचंद बारेला, कांतीलाल बारेला, लक्कडसिंग बारेला, सत्तरसिंग पावरा, अनिल बारेला, अनिल पावरा, रायसिंग बारेला, गण्या बारेला, पन्नालाल बारेला, पांड्या बारेला, गाट्या बारेला, हाससिंग पावरा, रामचंद बारेला, बाटा पावरा, दिलीप बारेला, खेलसिंग बारेला, देशिराम बारेला, राजु बारेला, संजय बारेला, मोहन बारेला आदींसह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

* लाखोंची झाली उलाढाल :- 

आदिवासी बांधव या उत्सवात नवे कपडे परिधान करून येतात या उत्सवात दाळ्या, फुटाणे, साखरेचे हार, कंगण, जलेबी, फळे, महिलांचे दागिने, असे मोठा प्रमाणावर खरेदी विक्री होते. टॅटू गोंधणारे, फोटो काढणारे, कुल्फीवाले तसेच इतर शीतपेयांची दुकाने मोठ्या प्रमाणावर होती. यात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे जाणकार सांगतात. 

दुपारी चारनंतर ढोल स्पर्धा भरविण्यात आली. यात शेकडो पथकांनी सहभाग घेतला. यासाठी अकरा हजार रुपयांचे पहिले बक्षीस, पाच हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आहे तर सहभागी प्रत्येकाला पाचशे रुपये प्रती सहभागी ढोलप्रमाणे आहे. याचे काम उशीरपर्यंत सुरु होते.

* चोख पोलीस बंदोबस्त :- 

या भोंगऱ्या बाजारात अडावद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस हवालदार भरत नाईक, शेषराव तोरे, गृहरक्षक दलाचे जवान संजय पवार, संजय शेलकर, रामदास महाजन, रामकृष्ण महाजन, प्रदीप माळी, किशोर पाटील, सदानंद पाटील, रमेश पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, दिपक कोळी, संदीप पाटील आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला.

Post a Comment

Previous Post Next Post