भुसावळ / प्रतिनिधी :- शिवजयंतीनिमित्त डॉं. निलेश राणे यांना त्यांच्या देश व परदेशातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा शिवभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार डॉं. राणे यांनी त्यांच्या वडिलांना समर्पित केला आहे, शिवजयंतीच्या दिवशी मधुकर राणे यांचा शिवभूषण पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉं. राणे यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यात व राष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. तसेच होतकरू खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या सामाजिक संस्थेकडून अनेक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आणि अनेक क्षेत्रात अग्रेसर राहून मोठ्या प्रमाणावर निस्वार्थी कार्य करीत आहेत.
डॉं. राणे हे राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाचे राज्यमंत्री (संघ) व भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महामंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनीमध्ये त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.