पत्रकार दूरदर्शी असावा!

* दिलासा फाउंडेशन अध्यक्ष मनोज कळमकर 

खालापूर / प्रतिनिधी :- समाजाच्या वेदना जाणणारा, भविष्य आणि भूतकाळातील घडामोडीची सांगड घालून वर्तमानात जगणारा असावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

नुकत्याच घडलेल्या स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण हादरवणारे आहे. विषय इथे संपत नाही.. हे प्रकरण पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरातील बसस्थानकात घडले. खालापूर बस स्थानकात देखील काही महिन्यापूर्वी हीच परिस्थिती होती. बस स्थानकातील दुकान बंद झाली की काळोखाचे साम्राज्य असायचे. हीच परिस्थिती पहाटे देखील असायची. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी, महिला प्रवासी अंधारात  बसायच्या. याशिवाय बस स्थानकात दारुड्यांनी कायम ठिय्या मांडलेला असायचा. पत्रकार मनोज कळमकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली. नगरपंचायतीला बस स्थानकात दिवाबत्तीची सोय करणे भाग पाडले. त्याहीपुढे आईच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने बस स्थानकात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविण्याचे उचललेले पाऊल म्हणजे गैरकृत्याला एक प्रकारे चाप बसला आहे. अनेकांच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट वाटप व वृक्षारोपण करून मनोज कळमकर यांनी तरुणासमोर आदर्श ठेवला आहे. प्रथम आपले गाव सुरक्षित या दृष्टीने सर्व समाज घटकांनी काम केल्यास भविष्यात लेकीबाळी सुरक्षित राहतील, अशी प्रतिक्रिया नागरीकांमधून उमटत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post